महात्मा बसवेश्वर कॉलेज परिसरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; महिलेला अटक
लातूर, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। बसवेश्वर कॉलेज परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी महिला
पोलीस कारवाई


लातूर, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। बसवेश्वर कॉलेज परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी महिला आरोपीला ताब्यात घेत तिच्याकडून चोरीस गेलेले १ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसवेश्वर कॉलेज परिसरात अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणि सोन्याची बुगडी लंपास केली होती. यामध्ये ५.६५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट आणि ०.२५० ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८४/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सारिका दगडू काळे (वय ३६, रा. विलास नगर, लातूर) हिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे लॉकेट आणि सोन्याची बुगडी असा एकूण १ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, सहायक फौजदार राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भादुळे, गोविंद राठोड, महादेव फुले तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती चौधरी यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande