उत्तराखंड : चमोलीतील बोगदा दुर्घटनेत आणखी एका कामगाराचा मृत्यू; मृतांचा आकडा 11 वर
देहरादून, 19 ऑगस्ट (हिं.स.)। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हाट-सियासैंण, मायापूर (पीपलकोटी) येथील विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू
UK THDC Tunnel Accident Death


देहरादून, 19 ऑगस्ट (हिं.स.)। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हाट-सियासैंण, मायापूर (पीपलकोटी) येथील विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 11 झाली आहे. मृत कामगाराची ओळख रोहित अशी झाली आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्याच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), ऋषिकेश येथे उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

राज्य आपत्ती संचालन केंद्राच्या वतीने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले की, निर्माणाधीन बोगद्यात 13 ऑगस्ट रोजी पाणी आणि मलबा आल्याने दुर्घटना घडली होती. दुर्घटनेनंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव अभियान राबवण्यात आले. या अभियानात एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, लष्कर आणि इतर बचाव पथकांनी सहभाग घेतला. दुर्घटनेनंतर अनेक कामगारांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आतापर्यंत मृतांची संख्या वाढून 11 झाली आहे.

उल्लेखनीय आहे की, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटीच्या मायापूर येथे टीएचडीसीच्या विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात 13 ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर सुमारे 117 तास चाललेले शोध आणि बचाव अभियान मंगळवारी पूर्ण झाले. बोगद्यात पाणी झिरपणे आणि भूस्खलनामुळे अनेक कामगार आत अडकले होते. दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू झाला असून, 12 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांमध्ये समाविष्ट रोहितचा बुधवारी सकाळी एम्स ऋषिकेश येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande