
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने सिंकफील्ड कप बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाशियर-लाग्रेव्हला हरवून अमेरिकेच्या वेस्ली सो सोबत संयुक्त आघाडी घेतली. या विजयामुळे प्रज्ञानानंदने शक्य असलेल्या आठपैकी पाच गुण मिळवले आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ग्रँड फायनल्समधील आपले स्थान निश्चित केले. प्रज्ञानानंदने केवळ २८ चालींमध्ये विजय मिळवला.
वेस्लीने आपल्याच देशाच्या सॅव्हियन सॅम्युअल्ससोबत आणखी एक सामना बरोबरीत सोडवला. तर झवोखिर सिंदारोव्हने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फोरेस्टला हरवून आपला सलग तिसरा सामना जिंकला आणि ४.५ गुणांसह अव्वल मानांकित बुद्धिबळपटूच्या जवळ पोहोचला.
दिवसाच्या आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात, जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरने अव्वल मानांकित अमेरिकन फॅबियानो कारुआनाला पराभूत करत सिंदारोव्हसोबत तिसरे स्थान विभागून घेतले. दिवसाच्या आणखी एका रोमांचक सामन्यात, नेदरलँड्सच्या अनिश गिरीने अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनसोबत सामना बरोबरीत सोडवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे