आसाम पूर : रिलायन्स फाउंडेशनकडून मुख्यमंत्री मदत निधीस २१ कोटींचे योगदान
दिसपुर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी रविवारी सांगितले की, रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी अप्पर आसाममध्ये अलीकडेच आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी आसाम मुख्यम
Assam Floods Reliance Foundation contributes CMRF


दिसपुर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी रविवारी सांगितले की, रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी अप्पर आसाममध्ये अलीकडेच आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी आसाम मुख्यमंत्री मदत निधीत २१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, या संस्थेने संकटकाळात नेहमीच आसामच्या जनतेला मदतीचा हात दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याने जेव्हाही कठीण काळाचा सामना केला आहे, तेव्हा रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी या नेहमीच आसामच्या जनतेच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

डॉ. सरमा यांनी कोविड-१९ महामारीच्या काळातील फाउंडेशनच्या मदतीची आठवण करून दिली. त्यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना वेळेवर मदत पुरवली होती. त्यांनी सांगितले की, या नव्या योगदानामुळे वरच्या आसाममधील पुरग्रस्त कुटुंबांसाठी मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आर्थिक मदतीबरोबरच रिलायन्स फाउंडेशनची पथके पुरग्रस्त भागांमध्ये अन्न, सार्वजनिक आरोग्य सेवा, आपत्कालीन निवारा आणि पशुधनासाठी मदत पुरविण्याचे कार्य करत आहेत. डॉ. सरमा म्हणाले की, आसामच्या जनतेप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी नीता अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande