इंडोनेशियात प्रवाशांनी भरलेल्या बोटीला भीषण आग; पाच जणांचा मत्यू, ४१ जण अजूनही बेपत्ता
जकार्ता, 02 ऑगस्ट (हिं.स.)।इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी प्रवासी फेरीबोटीला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण अद्या
इंडोनेशियात प्रवाशांनी भरलेल्या बोटीला भीषण आग; पाच जणांचा मत्यू, ४१ जण अजूनही बेपत्ता


जकार्ता, 02 ऑगस्ट (हिं.स.)।इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी प्रवासी फेरीबोटीला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.

शोध व बचाव संस्थेच्या माहितीनुसार, फेरीबोटीमध्ये एकूण २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी २२५ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मोहीम सातत्याने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही फेरीबोट पूर्व जावा प्रांतातील सुराबाया शहरातून दक्षिण सुलावेसी प्रांतातील मकासर शहराकडे निघाली होती. प्रवासादरम्यान मदुरा बेटाजवळील समुद्री क्षेत्रात हा अपघात घडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ही आग लागली; मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेने सांगितले की, समुद्रात बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम अखंडपणे सुरू आहे. सर्व बेपत्ता व्यक्तींचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी बचाव पथके समुद्री क्षेत्रात व्यापक स्तरावर कार्यरत आहेत. मदुरा बेट हे इंडोनेशियातील जावा बेटाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ स्थित असून, समुद्री वाहतुकीच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande