राष्ट्रपती 3 ते 5 ऑगस्ट ओडिशाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 ते 5 ऑगस्ट 2026 दरम्यान ओडिशाच्या दौऱ्यावर असतील. 3 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती कटक येथील ''जगद्गुरू कृपालू विद्यापीठा''चे उद्घाटन करतील. 4 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती रेल्वेने भ
राष्ट्रपती 3 ते 5 ऑगस्ट ओडिशाच्या दौऱ्यावर


नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 ते 5 ऑगस्ट 2026 दरम्यान ओडिशाच्या दौऱ्यावर असतील. 3 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती कटक येथील 'जगद्गुरू कृपालू विद्यापीठा'चे उद्घाटन करतील. 4 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती रेल्वेने भुवनेश्वर ते ब्रह्मपूर असा प्रवास करतील आणि तप्तपानी येथील 'मां कांधुणी देवी मंदिर' आणि 'शिव मंदिरात' दर्शन घेऊन आरती करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande