
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.)।केंद्रीय मंत्री आणि भाजप वरिष्ठ नेते पीयूष गोयल यांनी रविवारी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तरुणांमधील वाढत्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी स्वतःला पूर्वी “युवा नेता” समजत होते; मात्र आता तरुणांमध्ये त्यांची पूर्वीसारखी लोकप्रियता राहिलेली नाही.
पीयूष गोयल यांनी दावा केला की भाजपला युवा मतदारांचा सातत्याने पाठिंबा मिळत आहे. ते म्हणाले, “जनरेशन झेड (जेन- जी ) नेहमीच आमच्या सोबत राहिली आहे.”गोयल म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाला तरुणांचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना जगातील “सर्वात लोकप्रिय नेता” असेही संबोधले.
गोयल म्हणाले की, तरुणांशी त्यांचा असलेला संवाद आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांची सक्रिय उपस्थिती देशाच्या विकासाला अधिक गती देण्यास मदत करेल.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि तरुणांशी असलेल्या त्यांच्या जवळिकीमुळे अस्वस्थ झाले आहेत.”ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी स्वतःला युवा नेता मानत होते. आता हे सिद्ध झाले आहे की ते पंतप्रधान मोदी यांच्याइतके लोकप्रिय राहिलेले नाहीत.”
दिल्लीतील जंतर-मंतर येथे तरुणांनी केलेल्या आंदोलनाबाबत आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पीयूष गोयल यांनी पेपर लीक प्रकरणात केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले.ते म्हणाले की, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात आला आहे. गोयल यांच्या मते, २०२४ मध्ये एनडीए सरकारने हा कायदा आणला आणि नंतर दुरुस्त्यांद्वारे तो आणखी बळकट करण्यात आला.
या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, अशा प्रकरणांची जलद सुनावणी व्हावी यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांमध्ये खटले चालविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांनी असा आरोपही केला की काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी संसदेत या कायद्याला विरोध केला होता.
गोयल म्हणाले, “त्यांची निराशा आणि हताशा मी समजू शकतो, कारण मतदार त्यांना वारंवार नाकारत आहेत. ते सतत निवडणुका हरत आहेत. जेव्हा या विधेयकावर चर्चा होत होती, तेव्हा त्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा होता.”ते पुढे म्हणाले, “मी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आणि इतर पक्षांनी या विधेयकाला केलेल्या विरोधाचा निषेध करतो.”‘लोक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६’ ला गेल्या आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode