अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ट्विन फॉल्स शहरात शनिवारी दुपारी एका इन-एन-आउट बर्गर रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात किमान तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पो
अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी


वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ट्विन फॉल्स शहरात शनिवारी दुपारी एका इन-एन-आउट बर्गर रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात किमान तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचाही मृत्यू झाला असून सध्या समुदायासाठी कोणताही धोका उरलेला नाही. मात्र, मृत आणि जखमींची अंतिम संख्या अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा गोळीबार शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या व्यावसायिक भागात झाला. घटना घडली तेव्हा रेस्टॉरंट आणि परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलिस यंत्रणा आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी परिसरातील रस्ते तातडीने बंद करून नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले. वैद्यकीय पथकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले.

ट्विन फॉल्स पोलिस प्रमुख मॅथ्यू हिक्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आता समुदायासाठी कोणताही धोका उरलेला नसल्याचा आम्हाला विश्वास आहे.” त्यांनी सांगितले की, संशयित हल्लेखोराचा मृतदेह घटनास्थळाजवळच आढळून आला. पोलिस सध्या हल्लेखोराची ओळख पटवण्याचा आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हिक्स यांनी सांगितले की, घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मृत आणि जखमींची अचूक संख्या जाहीर करण्यापूर्वी संबंधित कुटुंबीयांना माहिती देणे आवश्यक होते. ही घटना ट्विन फॉल्समधील एका गजबजलेल्या शॉपिंग परिसरात घडली. या भागात हॉटेल्स, मोठी दुकाने आणि अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

काउंटी आयुक्त ब्रेंट रेनके यांनी सांगितले की, त्यांना शनिवारी सायंकाळी सुमारे चार वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, शेरिफ जॅक जॉन्सन यांनी सुरुवातीच्या माहितीत किमान पाच जण जखमी झाल्याचे सांगितले होते.

वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी किमान तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की मृत आणि जखमींची अंतिम संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. तसेच सुरुवातीला सांगितलेल्या मृतांच्या संख्येत हल्लेखोराचा समावेश होता की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबाराची सुरुवात इन-एन-आउट बर्गर रेस्टॉरंटच्या आत झाली. हे रेस्टॉरंट ट्विन फॉल्समध्ये अवघ्या एका आठवड्यापूर्वीच सुरू झाले होते आणि अल्पावधीतच स्थानिक नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले होते. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील अनेक रस्ते तसेच स्नेक रिव्हर कॅन्यनवरील प्रमुख पेरिन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सेंट ल्यूक्स मॅजिक व्हॅली मेडिकल सेंटरने सांगितले की, रुग्णालय प्रशासन पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयाने जखमींवर उपचार करत आहे. सुमारे 56 हजार लोकसंख्या असलेले ट्विन फॉल्स हे दक्षिण आयडाहोमधील एक महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र मानले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande