प्रयागराजचा अनस मलिक 'कुकू टीव्ही'च्या 'सबसे बडा ड्रामेबाज'मधील टॉप १२ स्पर्धकांमध्ये
मुंबई, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रयागराज येथील तरुण कलाकार अनस मलिक याने ''कुकू टीव्ही''च्या ''सबसे बडा ड्रामेबाज'' (Sabse Bada Dramebaaz) या पहिल्यावहिल्या ''रिअ‍ॅलिटी अ‍ॅक्टिंग मायक्रो-ड्रामा'' शोमध्ये स्थान मिळवून आपल्या शहराचे नाव उंचावले
अनस


मुंबई, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रयागराज येथील तरुण कलाकार अनस मलिक याने 'कुकू टीव्ही'च्या 'सबसे बडा ड्रामेबाज' (Sabse Bada Dramebaaz) या पहिल्यावहिल्या 'रिअ‍ॅलिटी अ‍ॅक्टिंग मायक्रो-ड्रामा' शोमध्ये स्थान मिळवून आपल्या शहराचे नाव उंचावले आहे. देशभरातून आलेल्या २,००० हून अधिक डिजिटल ऑडिशन्स आणि लाखो व्ह्यूजमधून, प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे निवडल्या गेलेल्या टॉप १२ स्पर्धकांमध्ये त्याचा समावेश आहे.

अनस मलिकचा प्रवास हा संघर्ष आणि कठोर परिश्रमांचा राहिला आहे. आर्थिक अडचणींच्या वातावरणात लहानाचा मोठा झालेला अनस अगदी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी पेलू लागला. त्याने प्रयागराजमधील गंगा घाटांवर छायाचित्रकार (फोटोग्राफर) म्हणून काम केले आणि नंतर सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याचे कुटुंब जयपूरला स्थायिक झाल्यानंतर, त्याने आपल्या वडिलांना कामात मदत करण्यासोबतच 'बी.एस्सी. नर्सिंग'चे शिक्षणही सुरू ठेवले. २०२० मध्ये एका ऑडिशनद्वारे अनसने अभिनयाच्या जगात पाऊल टाकले, नाटकांचे प्रशिक्षण घेतले आणि आता तो मुंबईत अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करत आहे.

आता अनस १० लाख रुपयांचे बक्षीस आणि 'कुकू टीव्ही'च्या आगामी मायक्रो-ड्रामामध्ये मुख्य भूमिका मिळवण्यासाठी शोमधील इतर ११ अंतिम स्पर्धकांशी (फायनलिस्ट) स्पर्धा करेल. या शोचे परीक्षण अभिनेता राकेश बेदी, अभिनेत्री जन्नत जुबेर आणि रिअ‍ॅलिटी स्टार प्रिन्स नरुला हे करतील. ४५ ते ६० भागांचा (प्रत्येक भाग साधारण दोन मिनिटांचा) हा शो अभिनयावर आधारित आव्हाने, मार्गदर्शन (मेंटॉरशिप), एलिमिनेशन आणि स्पर्धकांच्या वैयक्तिक संघर्षावर प्रकाश टाकणाऱ्या कथांच्या माध्यमातून स्पर्धकांचे मूल्यमापन करेल.

'सबसे बडा ड्रामेबाज'चा प्रीमियर या आठवड्यात केवळ 'कुकू टीव्ही' ॲपवर होणार आहे. 'कुकू टीव्ही'च्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मचे २०० दशलक्ष (२० कोटी) हून अधिक इन्स्टॉलेशन्स झाले आहेत आणि त्यावर सातहून अधिक भारतीय भाषांमध्ये ५,००० हून अधिक मायक्रो-ड्रामा उपलब्ध आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा देखील या कंपनीचा गुंतवणूकदार आणि ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande