क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई खेळांसाठी ४९२ भारतीय खेळाडूंना मंजुरी
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट (हिं.स.) क्रीडा मंत्रालयाने २०२६ च्या आशियाई खेळांसाठी ४९२ भारतीय खेळाडूंना मंजुरी दिली आहे. जपानमध्ये होणाऱ्या या खेळांसाठी ही मंजुरी देण्यात आली. यामध्ये ॲथलेटिक्स विभागातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक असून, ती ७३ आहे. १९ सप्ट
मनू भाकर


नवी दिल्ली, 23 ऑगस्ट (हिं.स.) क्रीडा मंत्रालयाने २०२६ च्या आशियाई खेळांसाठी ४९२ भारतीय खेळाडूंना मंजुरी दिली आहे. जपानमध्ये होणाऱ्या या खेळांसाठी ही मंजुरी देण्यात आली. यामध्ये ॲथलेटिक्स विभागातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक असून, ती ७३ आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान आयची, नागोया येथे होणाऱ्या या खेळांमध्ये भारत सहभागी होणार आहे. तथापि, क्रीडा मंत्रालयाने अद्याप सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या यादीला मंजुरी दिलेली नाही. यावर पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे समजते.

भारतीय ऑलिम्पिक महासंघाने सादर केलेल्या खेळाडूंच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. डोपिंगमुळे अपात्र ठरलेल्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. काही बदली खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. यावर आशिया ऑलिम्पिक परिषदेच्या मंजुरीनंतर निर्णय घेतला जाईल.

२०२६ च्या आशियाई खेळांसाठी ॲथलेटिक्समध्ये ३५ पुरुष आणि ३८ महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा, लांब उडीपटू मुरली श्रीशंकर, गुलवीर सिंग, तेजस्विन शंकर आणि ज्योती याराजी यांचा समावेश आहे. नेमबाजी संघात एकूण ३० खेळाडू असून, त्यात पुरुष आणि महिला नेमबाजांची संख्या समान आहे. मनू भाकर, ईशा सिंग आणि एलावेनिल वलारिवन यांसारख्या नावांची नेमबाजीसाठी निवड झाली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पाच खेळाडू आहेत: चार महिला आणि एकमेव पुरुष, ऋषिकांत सिंग. इतर नावांमध्ये मीराबाई चानू आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती ज्ञानेश्वरी देवी यांचा समावेश आहे. बॅडमिंटन संघात २० खेळाडू असून, त्यात पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन, तसेच त्रिस जॉली-गायत्री गोपीचंद, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांचा समावेश आहे.

बॉक्सिंगसाठी 11, ई-स्पोर्ट्ससाठी पंधरा, रोइंगसाठी 22, रग्बीमध्ये महिलांचा 13 सदस्यीय संघ, व्हॉलीबॉलमध्ये पुरुषांचा 12 सदस्यीय संघ, सेपक टकरासाठी 21, क्रिकेटसाठी 30 आणि कबड्डीसाठी 24 खेळाडूंची निवड झाली आहे. टेनिसमध्ये सुमित नागल भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. कुस्तीसाठी 16 कुस्तीपटूंची निवड झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande