श्रीनिवास खळेंच्या सुरांतून स्मृतींना उजाळा
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। ‘सुंदर ते ध्यान’ या भावगीताने सुरुवात झालेल्या ‘सूर काही राहिले’ या संगीत कार्यक्रमातून ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या अजरामर संगीतसृष्टीला उजाळा देण्यात आला. अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतांच्या सुरांनी अॅम्फ
Ndmd


सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। ‘सुंदर ते ध्यान’ या भावगीताने सुरुवात झालेल्या ‘सूर काही राहिले’ या संगीत कार्यक्रमातून ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या अजरामर संगीतसृष्टीला उजाळा देण्यात आला. अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतांच्या सुरांनी अॅम्फी थिएटर मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखा आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सर्व कलावंतांचे स्वागत करण्यात आले. अमोल धाबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश मोकाशे यांनी आभार मानले.

कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि प्रसिद्धीप्रमुख विनायक होटकर यावेळी उपस्थित होते.‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘भेटी लागी जीवा’ यांसारखी भावगीते आणि भक्तिगीते सादर करण्यात आली. तसेच ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘किलबील किलबील पक्षी बोलती’, ‘शाळा सुटली पाटी फुटली’ यांसारख्या लोकप्रिय बालगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.वेणुगोपाल संगीतालयाच्या कलावंतांनी या गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. गायक रूपक झंकार कुलकर्णी, पियुष आवारे, स्वरदा मोहोळकर, रमा कुलकर्णी, श्रावस्ती माळशिखरे आणि माऊली जोशी यांनी सुमधुर आवाजातून गीते सादर केली. त्यांना तबल्यावर झंकार कुलकर्णी आणि कौस्तुभ चांगभले, व्हायोलिनवर केदार गुळवणी, तर बासरीवर जयेश कुलकर्णी यांनी साथ दिली. संगीत संयोजन शर्वरी कुलकर्णी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आदिती कुलकर्णी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande