SBI म्युच्युअल फंडाच्या Magnum SIF ला इक्विटी श्रेणीतील आतापर्यंतचा सर्वाधिक NFO प्रतिसाद
* Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund मधून ₹1,154 कोटींची उभारणी मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.) - SBI म्युच्युअल फंडाने Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund या आपल्या न्यू फंड ऑफरची (NFO) यशस्वी सांगता केली. Magnum SIF अंतर्गत ही दुसरी गुंतवणूक
एसबीआय म्युच्युअल फंड


SBI म्युच्युअल फंड Magnum SIF


* Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund मधून ₹1,154 कोटींची उभारणी

मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.) - SBI म्युच्युअल फंडाने Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund या आपल्या न्यू फंड ऑफरची (NFO) यशस्वी सांगता केली. Magnum SIF अंतर्गत ही दुसरी गुंतवणूक रणनीती आहे. 20 ऑगस्ट 2026 रोजी NFO बंद झाला. या माध्यमातून ₹1,154 कोटींची उभारणी झाली. इक्विटी SIF श्रेणीतील आतापर्यंतची ही सर्वाधिक NFO उभारणी आहे.

ही ओपन-एंडेड गुंतवणूक रणनीती प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करते. मोठ्या कंपन्यांच्या समभागांव्यतिरिक्त इतर समभागांमध्ये गुंतवणूक करण्यावर या रणनीतीचा भर आहे. डेरिव्हेटिव्ह साधनांच्या माध्यमातून इक्विटीमध्ये मर्यादित शॉर्ट पोझिशन्स घेतल्या जातात.

बाजार भांडवलानुसार टॉप 100 बाहेरील कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साधणे हा या रणनीतीचा उद्देश आहे. परतावा वाढवण्यासाठी किंवा जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून मर्यादित शॉर्ट पोझिशन्स घेतल्या जातात. मात्र, गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी नाही.

7 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत NFO गुंतवणुकीसाठी खुला होता. गुंतवणूकदारांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. SIF व्यवस्थेबाबत वाढती जागरूकता आणि स्वीकारयाचे हे द्योतक आहे. बाजारातील संधींचा लाभ घेताना पोर्टफोलिओमधील अस्थिरता नियंत्रित करण्याच्या उद्देशाने वेगळ्या गुंतवणूक रणनीतींची मागणीही वाढत आहे.

SBI Funds Management Limited चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष मिश्रा म्हणाले, “MagnumEquity Ex-Top 100 Long Short Fund NFO ला मिळालेला मजबूत प्रतिसाद गुंतवणूकदारांचा वेगळ्या जोखीम व्यवस्थापन रणनीतींमधील वाढता रस दर्शवतो. बाजारातील आमच्या संशोधनाधारित क्षमतेवरील त्यांचा विश्वासही यातून दिसतो. Magnum SIF ब्रँडअंतर्गत आम्ही विविध गुंतवणूक रणनीतींची मालिका विकसित करत राहू. गुंतवणूकदारांना स्पष्टता आणि विश्वासासह पर्याय उपलब्ध करून देणे आणि पोर्टफोलिओची रचना अधिक लवचिकपणे करण्यास मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

SIF Equity चे प्रमुख गौरव मेहता, CFA म्हणाले, “Specialized Investment Funds म्हणजेच SIF गुंतवणूकदारांना दोन्हींचे फायदे देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. म्युच्युअल फंडाच्या रचनेत मिळणारी नियामक सुरक्षितता आणि AIF व PMS सारख्या पर्यायी गुंतवणूक व्यवस्थांमध्ये दिसणारी लवचिकता यांचा यात समावेश आहे. शॉर्ट पोझिशन्स घेण्याची आणि पर्यायांचा लवचिक वापर करण्याची क्षमता वेगळे जोखीम-परतावा परिणाम साधण्यास मदत करते. त्याच वेळी म्युच्युअल फंडाची कर-सवलत कायम राहते.”

SBI Funds Management Limited विषयी

SBI Funds Management Limited ही SBI म्युच्युअल फंडाची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ती भारतीय स्टेट बँक (SBI) आणि युरोपातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी तसेच जागतिक मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची कंपनी Amundi यांचा संयुक्त उपक्रम आहे.

SBIFML म्युच्युअल फंड, Specialized Investment Funds, Portfolio Management Services, Offshore Funds, Alternative Investment Funds (AIFs) आणि तिच्या उपकंपनीमार्फत GIFT City मधील विविध गुंतवणूक सेवा उपलब्ध करून देते. या सेवा किरकोळ गुंतवणूकदार, उच्च निव्वळ संपत्ती असलेले गुंतवणूकदार (HNI), कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

SBI म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी आहे. एप्रिल-जून 2026 या तिमाहीत कंपनीच्या सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्तेचे (AAUM) मूल्य ₹12.57 लाख कोटींपेक्षा जास्त होते. (स्रोत : AMFI)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande