हॉकी विश्वचषक 2026 : भारताचा ३-१ ने पराभव; नेदरलँड्स उपांत्य फेरीत
ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 23 ऑगस्ट (हिं.स.) २०२६ च्या पुरुष हॉकी विश्वचषकाच्या ''ई'' गटात भारताचा नेदरलँड्सकडून ३-१ ने पराभव झाला. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ यजमान संघासमोर टिकू शकला नाही. या निकालामुळे त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतच
भारतीय हॉकी संघ


ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 23 ऑगस्ट (हिं.स.) २०२६ च्या पुरुष हॉकी विश्वचषकाच्या 'ई' गटात भारताचा नेदरलँड्सकडून ३-१ ने पराभव झाला. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ यजमान संघासमोर टिकू शकला नाही. या निकालामुळे त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे. आता त्यांना केवळ स्वतःच्याच निकालांवर नव्हे, तर इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. आमस्टेलवीन येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सकडून डुको टेलगेनकॅम्प, टायप हुडेमाकर्स आणि थियस व्हॅन डॅम यांनी गोल केले. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल केला.

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यातील सर्व गोल मध्यंतरानंतर झाले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. नेदरलँड्सने १० मिनिटांच्या आत पहिले दोन गोल केले. भारताने प्रत्युत्तर दिले, पण सामना संपण्याच्या पाच मिनिटे आधी आणखी एक गोल खाल्ला आणि भारतीय संघ प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरला. भारताचा पुढील सामना २४ ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाविरुद्ध आहे.

भारताच्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, संघाने पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चांगला खेळ केला, पण अजूनही सातत्य दाखवण्याची गरज आहे. विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन नेदरलँड्सने ४१ व्या मिनिटाला टेलगेनकॅम्पच्या गोलने खाते उघडले. त्यानंतर, ५१ व्या मिनिटाला हुडेमॅकर्सने एक शानदार दुसरा गोल केला. ५५ व्या मिनिटाला व्हॅन डॅमने डच संघासाठी शेवटचा गोल केला.

भारताला सामन्यात सात पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यापैकी फक्त एकाचेच गोलमध्ये रूपांतर करता आले. दुसरीकडे, नेदरलँड्सला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांना एकाही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. फम त्यांनी मैदानी गोल करून त्याची भरपाई केली आणि भारताला पराभवाच्या दिशेने ढकलले. या निकालामुळे नेदरलँड्स उपांत्य फेरीत पोहोचला. आता त्यांचे सहा गुण झाले असून, त्यापैकी तीन गुण त्यांना 'अ' गटातील सामन्यांमधून मिळाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande