अमेरिकन ओपन २०२६ : सेरेना विल्यम्स कार्लोस अल्कारजबरोबर मिश्र दुहेरीत सहभागी होणार
न्यूयॉर्क (अमेरिका), 23 ऑगस्ट (हिं.स.) दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत स्पॅनिश स्टार कार्लोस अल्कारजबरोबर जोडी जमवून अमेरिकन ओपनमध्ये पुनरागमन करणार आहे. ही जोडी या स्पर्धेतील सर्वात चर्चित आणि हाय-प्रोफाईल जोड्यांपैकी एक
सेरेना विल्यम्स


न्यूयॉर्क (अमेरिका), 23 ऑगस्ट (हिं.स.) दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत स्पॅनिश स्टार कार्लोस अल्कारजबरोबर जोडी जमवून अमेरिकन ओपनमध्ये पुनरागमन करणार आहे. ही जोडी या स्पर्धेतील सर्वात चर्चित आणि हाय-प्रोफाईल जोड्यांपैकी एक ठरणार आहे.

युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (USTA) जाहीर केले की, विल्यम्स आणि अल्कारज यांना या स्पर्धेसाठी 'वाईल्ड कार्ड' प्रवेश मिळाला आहे. मिश्र दुहेरीच्या मुख्य फेरीला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. २०२२ नंतर विल्यम्सचा अमेरिकन ओपनमधील हा पहिलाच सहभाग असेल. २३ वेळा ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या विल्यम्सने या उन्हाळ्यात स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले होते.

दुसरीकडे, उजव्या हाताच्या मनगटाच्या दुखापतीमुळे एप्रिलपासून स्पर्धेपासून दूर असलेल्या अल्कारजने, या दुखापतीतून सावरल्यानंतर आपले अमेरिकन ओपन एकेरीचे विजेतेपद राखण्यासाठी खेळणार असल्याचे या आठवड्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. त्याच वेळी, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जॅनिक सिनरने उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे, अशी माहिती या इटालियन टेनिसपटूच्या टीमने दिली. सिनरचा शेवटचा सहभाग विम्बल्डनमध्ये होता, जिथे त्याने आपले पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आणि या हंगामातील पहिले मोठे जेतेपद पटकावले होते.

सिनरच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, हा इटालियन टेनिसपटू युरोपमध्येच थांबून आपल्या वैद्यकीय आणि कामगिरी विषयक पथकासोबत पुनर्वसन प्रक्रिया सुरू ठेवेल. बीजिंग आणि शांघाय येथील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवून, आशियाई दौऱ्यादरम्यान पुन्हा खेळात परतण्यावर मुख्य भर असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande