तेजा सज्जाला मिळाली वाढदिवसाची मोठी भेट; 'झोम्बी रेड्डी'च्या सिक्वेलची घोषणा
मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता तेजा सज्जाच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या लोकप्रिय ''झोम्बी रेड्डी'' या चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ''पीपल मीडिया फॅक्टरी''ने या चित्रपटाला ''झोम्बी रेड्डी: नेक्स्ट ले
झोंबी


मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता तेजा सज्जाच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या लोकप्रिय 'झोम्बी रेड्डी' या चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'पीपल मीडिया फॅक्टरी'ने या चित्रपटाला 'झोम्बी रेड्डी: नेक्स्ट लेव्हल' असे नाव दिले आहे. मूळ चित्रपटाच्या यशानंतर, ही फ्रँचायझी आता भव्य पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या एका झलक (glimpse) मध्ये तेजा सज्जा हजारो झोम्बींच्या जमावासमोर एकटा उभा असल्याचे दिसते, जे या चित्रपटाची भव्यता आणि त्यातील जबरदस्त ॲक्शनची झलक दर्शवते. या चित्रपटात स्टार उपेंद्र महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत, तर शनाया कपूर या प्रोजेक्टद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

'झोम्बी रेड्डी: नेक्स्ट लेव्हल'चे दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा करणार आहेत, तर कथा आणि फ्रँचायझीची मूळ संकल्पना प्रशांत वर्मा यांची आहे. पटकथा हुसेन दलाल, प्रशांत वर्मा आणि सुपर्ण एस. वर्मा यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. 'हनु-मॅन' आणि 'मिराई' सारख्या प्रोजेक्ट्ससाठी ओळखले जाणारे गौरा हरी याचे संगीत देत आहेत. टी.जी. विश्व प्रसाद आणि कृती प्रसाद यांच्याद्वारे भव्य स्तरावर निर्मित हा झोम्बी ॲक्शन-कॉमेडी चित्रपट ॲक्शन, साहस आणि विनोदाचा संगम असेल. या चित्रपटाचे जग झोम्बींनी व्यापलेले असेल आणि तेजाचे पात्र त्यांच्याविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व करताना दिसेल.

आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, हा चित्रपट जगभरात सात भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, नेपाळी आणि जपानी या भाषांचा यात समावेश आहे.

तेजा सज्जा म्हणाला की, 'झोम्बी रेड्डी'ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळेच या विश्वाला अधिक मोठ्या स्तरावर नेण्याचा आत्मविश्वास टीमला मिळाला. दरम्यान, दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांनी सांगितले की, यावेळी पूर्वीपेक्षा अधिक धडाकेबाज, नेत्रदीपक आणि रोमांचक असा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे त्यांचे ध्येय आहे. निर्माता टी.जी. विश्व प्रसाद यांच्या मते, जागतिक स्तरावर भारतीय व्यावसायिक चित्रपटसृष्टीला भव्य स्वरूपात सादर करणे हे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande