केजमध्ये वृद्ध दाम्पत्याला गंडा
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। केज येथील पेट्रोल पंपा समोर उभ्या असलेल्या वृद्ध दांपत्य जवळ जाऊन दोन भामट्यांनी विचारपूस करीत त्यांच्या खांद्यावर हात टाकून खिशातील ३२ हजार रुपये लांबविल्याची घटना शहरात घडली. पिसेगाव ता. केज येथील भगवान भाऊराव नेहरकर वय
फसवणूक


बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। केज येथील पेट्रोल पंपा समोर उभ्या असलेल्या वृद्ध दांपत्य जवळ जाऊन दोन भामट्यांनी विचारपूस करीत त्यांच्या खांद्यावर हात टाकून खिशातील ३२ हजार रुपये लांबविल्याची घटना शहरात घडली.

पिसेगाव ता. केज येथील भगवान भाऊराव नेहरकर वय (७२ वर्ष) आणि त्यांची पत्नी हे दोघे केजला आले होते. त्यांनी जवळचे ३० हजार रुपये व बँकेतील काढलेले २ हजार रुपये असे एकूण ३२ हजार रुपये शर्टच्या खिशात ठेवून ते दोघे अंबाजोगाई रस्त्यावरील दांगट पेट्रोल पंपा समोर उभे राहिले होते. याच वेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांना बाबा तुम्ही कुठल्या गावचे ! असे विचारून त्यांच्या डाव्या खांद्यावर हात टाकून शर्टच्या खिशातील ३२ हजार रुपये काढून घेऊन पोबारा केला.

भगवान नेहरकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अनोळखी दोन भामट्यां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ५३३/२०२६ भा न्या सं ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फूटेज वरून तपास लागण्याची शक्यता; भगवान नेहरकर यांच्या खिशातील ३२ हजार रु. लांबविणाऱ्या ठकांचा तपास काढण्यासाठी पोलिस पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास घेत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande