
नाशिक, 24 ऑगस्ट (हिं.स.)। हत्याराने एटीएम मशीन खोलण्याचा प्रयत्न करून नुकसान केल्याचा प्रकार जेलरोड येथे घडला. याबाबत माधुरी राजेश गहाणे (रा. लोटस हाईट अपार्टमेंट, तपोवन, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की जेलरोड येथे सिटी सेंटर कॉम्प्लेक्समध्ये ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने या एटीएम मशीनचे निरीक्षण करून ते उघडण्याचा प्रयत्न केला आणि या एटीएम मशीनला असलेले मॅग्नेटिक सेन्सर, तसेच वायरी तोडून उजव्या बाजूस असलेले स्टीकर व स्पंज फाडून एटीएम मशीनचे नुकसान केले व एटीएम मशीन खोलण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI