आदी फोमने केला ‘स्लीपली’ या नव्या गादी ब्रँडचा शुभारंभ
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.) : आदी फोमने ‘स्लीपली’ या नव्या गादी ब्रँडच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. या माध्यमातून कंपनीने भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या झोप व गादी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. फोम निर्मिती क्षेत्रातील 36 वर्षांहून अधिक अ
‘स्लीपली’ या नव्या गादी ब्रँडचा शुभारंभ करताना आदी फोमनेचे पदाधिकारी


नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.) : आदी फोमने ‘स्लीपली’ या नव्या गादी ब्रँडच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. या माध्यमातून कंपनीने भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या झोप व गादी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. फोम निर्मिती क्षेत्रातील 36 वर्षांहून अधिक अनुभवाच्या बळावर ‘स्लीपली’ने आदी समूहाची गुणवत्ता आणि सातत्याची परंपरा कायम ठेवत आराम, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे.

‘स्लीपली’ची निर्मिती प्रत्येक व्यक्तीसाठी उत्तम झोप अधिक सुलभ आणि अर्थपूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. पारंपरिक गादी उत्पादनांच्या पलीकडे जात आराम, योग्य आधार, विचारपूर्वक केलेली रचना आणि झोपेशी संबंधित नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर ब्रँडचा भर आहे.

‘स्लीपली’च्या प्रमुख नवकल्पनांपैकी एक म्हणजे ‘एस 5 ऍडॅप्टिव्ह झोन्स’. ही कंपनीची खास पाच-झोन झोप आधार प्रणाली असून शरीराच्या विविध प्रमुख भागांना आवश्यकतेनुसार वेगवेगळा आधार देण्यासाठी ती विकसित करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक झोप आणि आरामाच्या गरजांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देणारी उत्पादने विकसित करण्याच्या ‘स्लीपली’च्या दृष्टिकोनाचे हे तंत्रज्ञान उदाहरण आहे. ‘एस५ अॅडॅप्टिव्ह झोन्स’ तंत्रज्ञानाचा समावेश ‘स्लीपली’च्या निवडक गादी मॉडेल्समध्ये करण्यात आला आहे.

ब्रँडच्या शुभारंभप्रसंगी आदी फोमचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘स्लीपली’चे संस्थापक लोकेश जैन म्हणाले, स्लीपली हा आमच्या 36 वर्षांच्या अनुभवाचा आणि नव्या पिढीच्या अपेक्षांचा संगम आहे. फोम आणि उत्पादन क्षेत्रातील आमचे ज्ञान आम्ही झोप, आराम आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या नव्या दृष्टिकोनाशी जोडले आहे. एस 5 ऍडॅप्टिव्ह झोन्ससारख्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या झोपेच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने विकसित करण्यावर आमचा भर आहे. त्याचबरोबर अधिकाधिक ग्राहकांना दर्जेदार आराम उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्यासाठी स्लीपली हा केवळ एका ब्रँडचा शुभारंभ नसून, उत्तम आराम, चांगली झोप आणि अधिक चांगल्या भविष्यातील प्रवासाची सुरुवात आहे.

‘स्लीपली’चा उत्पादन पोर्टफोलिओ विविध ग्राहकांच्या पसंती आणि झोपेच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या आरामदायीपणा आणि बांधणीच्या श्रेणीतील गाद्यांचा समावेश आहे. हा ब्रँड ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमांमधून उपलब्ध असून ग्राहकांना विविध माध्यमांतून ‘स्लीपली’ची उत्पादने जाणून घेणे, त्यांचा अनुभव घेणे आणि खरेदी करणे शक्य होणार आहे.

आदी समूहाच्या मते, ‘स्लीपली’ हा कंपनीच्या प्रवासातील पुढील महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक दशकांच्या उत्पादन क्षेत्रातील अनुभवाला नव्या पिढीच्या ग्राहक-केंद्रित ब्रँडशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. उत्तम झोपेमुळे दैनंदिन जीवन अधिक चांगले होऊ शकते, या विश्वासावर ब्रँडची संकल्पना आधारित आहे.

फोम निर्मिती क्षेत्रातील 36 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या आदी समूहाने वितरण क्षेत्रातील सुरुवातीच्या प्रवासानंतर एक सक्षम फोम उत्पादन व्यवसाय म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गुणवत्ता, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण तांत्रिक प्रगती याप्रती असलेल्या बांधिलकीमुळे समूहाने ‘स्लीपली’च्या शुभारंभासाठी मजबूत पायाभरणी केली आहे.

‘स्लीपली’च्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारच्या आराम आणि बांधणीच्या श्रेणीतील गाद्यांचा समावेश असून, एस५ ऍडॅप्टिव्ह झोन्स हे निवडक उत्पादनांमध्ये उपलब्ध असलेले कंपनीचे वैशिष्ट्यपूर्ण झोप तंत्रज्ञान आहे. आराम, नावीन्य आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा यांचा समतोल साधत भारतीय गादी बाजारपेठेत नवा पर्याय उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande