लातूर : विनापरवाना कत्ती बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कारवाई
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारदार लोखंडी कत्ती बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणावर विवेकानंद चौक पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून धारदार लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली असून, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई


लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारदार लोखंडी कत्ती बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणावर विवेकानंद चौक पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून धारदार लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली असून, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने कृपा सदन रोड, हरिभाऊ नगर परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे जुन्या वापरातील लाकडी मूठ असलेली लोखंडी कत्ती आढळून आली. संबंधित तरुणाकडे हे शस्त्र बाळगण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी ऋषीकेश भगवान सातपुते (वय २० वर्षे, रा. पिंटू हॉटेल, लातूर) याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०१/२०२६, कलम ४ व २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ व्ही. डी. सूर्यवंशी यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ डी. यू. हावा करीत आहेत.

लातूर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande