
बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा, बीडच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. तपासादरम्यान सदरचा गुन्हा शिवम जनक कसबे (वय 19, रा. सैनिकी कॉलनी, मोरेवाडी, अंबाजोगाई), योगेश हनुमंत शिंपले (वय 18, रा. कुंभेफळ, ता. अंबाजोगाई) व इतर एक यांची केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी शिवम कसबे व योगेश शिपले या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ₹82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण गु.र.नं. 286/2026, कलम 309(4), 3(5) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत घेऊळान आरोर्पीचा माग काढ़त ही कारवाई यशस्वी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis