१५ वर्षांपासून फरार आरोपीला नांदेड पोलिसांनी बीड जिल्ह्यातून केली अटक
बीड, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। तमसा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून अटक केली. झुंबर चंदर काळे (वय ६५, रा. सावळेश्वर, ता. केज, जि. बीड) असे
पोलीस कारवाई


बीड, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। तमसा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून अटक केली. झुंबर चंदर काळे (वय ६५, रा. सावळेश्वर, ता. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नांदेड जिल्ह्यातील फरार व वांछित आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना आरोपी सावळेश्वर येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. काळे हा तमसा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १८/२०११, कलम ४५७ व ३८० मधील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील कारवाईसाठी तमसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande