राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात “खेलो इंडिया डायलॉग- खेल की बात, पीएम मोदी के साथ ” कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (हिं.स.)राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 निमित्त 27 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात “खेलो इंडिया डायलॉग- खेल की बात, पीएम मोदी के साथ ” या भव्य युवा सहभागात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातील 1,500 हून अधि
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (हिं.स.)राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 निमित्त 27 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात “खेलो इंडिया डायलॉग- खेल की बात, पीएम मोदी के साथ ” या भव्य युवा सहभागात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातील 1,500 हून अधिक कार्यक्रमस्थळांच्या ठिकाणी तरुण वर्ग, खेळाडू आणि शैक्षणिक संस्था एकत्र येणार आहेत.

या राष्ट्रव्यापी उपक्रमामुळे उदयोन्मुख तरुण खेळाडूंना भारतातील क्रीडा आणि युवा परिसंस्थेच्या भविष्याविषयीच्या त्यांच्या कल्पना, सूचना तसेच नाविन्यपूर्ण विचार सामायिक करण्यासाठी एक थेट व्यासपीठ उपलब्ध होईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी, एआयआयएम आघाडीची वैद्यकीय महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सम्बोधीत करतील. त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देशभरातील सर्व ठिकाणी एकाच वेळी प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात होईल.

क्रीडाक्षेत्रात रुची असणाऱ्या तरुणांचा आघाडीचे भारतीय क्रीडापटू आणि पदकविजेते यांच्याशी प्रत्यक्षात होणारा संवाद हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल. दीपा कर्माकर, सायना नेहवाल, गगन नारंग, श्रीजेश, मेरी कोम, बायचुंग भुतिया, गोपीचंद, अंजू बॉबी जॉर्ज, कर्णम मल्लेश्वरी, मीराबाई चानू आणि पी.टी.उषा यांच्यासह सुप्रसिद्ध क्रिकेटपटू उपस्थित तरुणांशी बातचीत करतील आणि क्रीडा क्षेत्रातील आपापली वाटचाल, आव्हाने तसेच अनुभव सामायिक करतील.

या कार्यक्रमातील सहभाग खेळाडूंपुरता सीमित न राहता यामध्ये खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री तसेच विविध राज्यांचे क्रीडामंत्री यांचा देखील त्यात समावेश असेल आणि ते उपस्थित तरुणांशी संवाद साधतील तसेच निश्चित केलेल्या चार संकल्पनांविषयी त्यांच्या कल्पना जाणून घेऊन सूचना समजून घेतील.या उपक्रमामध्ये विकसित भारत युवा नेते संवाद प्रश्नमंजुषेचे देखील आयोजन करण्यात येईल तसेच तरुण सहभागींना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करुन केवळ एकदिवसीय कार्यक्रमाच्या आयोजनापलीकडे जात तरुणांच्या सातत्यपूर्ण सहभाग निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande