
बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेवराई तालुक्यात देवकी गाव हद्दीतील हॉटेल तुळजाई येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर DYSP पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत पैसे पणाला लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या 12 जणांवर कारवाई करण्यात आली असून, रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 8 लाख 59 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis