सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन; सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या कमजोरीनंतर जोरदार पुनरागमन पाहायला मिळाले. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने घसरणीतून सावरत हिरव्या निशाणात व्यवहाराचा शेवट केला. आजच्या तेजी
Stock Market Closing


नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या कमजोरीनंतर जोरदार पुनरागमन पाहायला मिळाले. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने घसरणीतून सावरत हिरव्या निशाणात व्यवहाराचा शेवट केला. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७३.६२ अंकांच्या घसरणीसह ७७,२९५.४९ अंकांवर उघडला. सुरुवातीला खरेदी वाढल्याने तो ७७,३९०.७२ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्स सकाळी साडेदहा वाजता २४३.२० अंकांनी घसरून ७७,१२५.९१ अंकांवर आला. दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा खरेदीला वेग आल्याने बाजाराने जोरदार पुनरागमन केले. दिवसाच्या नीचांकी पातळीवरून ५४० अंकांची झेप घेत सेन्सेक्स अखेर २८६.९८ अंक म्हणजेच ०.३७ टक्क्यांच्या वाढीसह ७७,६५६.०९ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४३.३० अंकांच्या घसरणीसह २४,१७५.७५ अंकांवर सुरू झाला. सकाळच्या सत्रात विक्री वाढल्याने निफ्टी १०३.६० अंकांनी घसरून २४,११५.४५ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीने नीचांकी पातळीवरून २१९ अंकांची सुधारणा केली आणि अखेर ११५.५० अंक म्हणजेच ०.४८ टक्क्यांच्या वाढीसह २४,३३४.५५ अंकांवर व्यवहार पूर्ण केला.

आज माहिती-तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. ग्राहक टिकाऊ वस्तू, पायाभूत सुविधा, प्रसारमाध्यमे, वाहन, भांडवली वस्तू, दैनंदिन वापराच्या वस्तू, धातू, तेल-वायू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकातही तेजी राहिली. मात्र, ऊर्जा आणि खासगी बँकिंग क्षेत्रावर विक्रीचा दबाव दिसून आला. मध्यम आकाराच्या कंपन्यांचा निर्देशांक ०.५४ टक्क्यांनी वाढला, तर लहान कंपन्यांच्या निर्देशांकात ०.१० टक्क्यांची घसरण झाली. आजच्या व्यवहारानंतर बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४९३.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील सत्रात ते ४९३.०७ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,५२५ शेअर्सचा सक्रियपणे व्यापार झाला. यापैकी २,०९७ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,२२९ शेअर्स घसरले आणि १९९ शेअर्स स्थिर राहिले. त्याचप्रमाणे, आज एनएसईवर ३,०९५ शेअर्सचा सक्रिय व्यापार झाला. यापैकी १,४१४ शेअर्स नफ्यात बंद झाले आणि १,६८१ शेअर्स तोट्यात बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २४ शेअर्स नफ्यात बंद झाले आणि ६ शेअर्स तोट्यात बंद झाले. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ३४ शेअर्स नफ्यात बंद झाले आणि १६ शेअर्स तोट्यात बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस, मॅक्स हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि अदानी पोर्ट्स हे प्रमुख तेजीत राहिले. दुसरीकडे एचडीएफसी लाइफ, सिप्ला, ओएनजीसी, कोल इंडिया आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजमध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande