उत्तर प्रदेशातील ६० वर्षांवरील महिलांना आता आजीवन बसप्रवास मोफत; योगी सरकारचा मोठा निर्णय
लखनऊ, 25 ऑगस्ट (हिं.स.)।उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत २४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये ‘लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजने’लाही मंजुरी देण्यात आली आह
उत्तर प्रदेशातील ६० वर्षांवरील महिलांना आता आजीवन बसप्रवास मोफत; योगी सरकारचा मोठा निर्णय


लखनऊ, 25 ऑगस्ट (हिं.स.)।उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत २४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये ‘लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजने’लाही मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (युपीएसआरटीसी) सर्व बसमध्ये आजीवन मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आपले वय आणि ओळख सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.सरकारच्या मते, या योजनेचा लाभ राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाकडे ज्येष्ठ महिलांसाठी मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे.

राज्य सरकारने म्हटले आहे की, ‘लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजने’च्या माध्यमातून ज्येष्ठ महिलांना प्रवासासाठी आर्थिक मदत मिळणार असून, राज्यातील त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. योजना लागू झाल्यानंतर पात्र महिलांना युपीएसआरटीसी बसमध्ये कोणतेही भाडे न देता प्रवास करता येणार आहे.दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याशिवाय विविध विभागांशी संबंधित एकूण २४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. इतर निर्णय आणि प्रस्तावांचा सविस्तर तपशीलही लवकरच जाहीर केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande