हिराबोरी तांडा शाळेला आमदार चिखलीकरांची सस्नेह भेट
नांदेड, २६ ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच
अ


नांदेड, २६ ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेतली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासातील प्रगती, शाळेतील अनुभव तसेच विविध उपक्रमांबाबत आमदार चिखलीकर यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चितच ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भेटीदरम्यान आमदार चिखलीकर यांनी स्थानिक गावकऱ्यांशीही संवाद साधला. तांड्यातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. हिराबोरी तांड्यातील सर्व मूलभूत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande