
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जालना अंतर्गत कडेगाव–देवगाव–धोपटेश्वर ते पाडळी–पिरसावंगी मार्गावरील दुधना नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या पुलाच्या कामासाठी सन २०२६ अंतर्गत ₹३५८.९३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे परिसरातील गावांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दुधना नदीवरील हा पूल केवळ दोन ठिकाणांना जोडणारा मार्ग नसून, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला गती देणारा विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी कमी होऊन परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पुलामुळे कडेगाव, देवगाव, धोपटेश्वर, पाडळी, पिरसावंगी तसेच परिसरातील गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार असून, शेतमालाची वाहतूक, बाजारपेठेशी संपर्क आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना देखील चालना मिळणार आहे.
विकासकामे ही केवळ भूमिपूजन आणि लोकार्पणापुरती मर्यादित न राहता ती जनतेच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून आणणारी असावीत, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बदनापूर मतदारसंघातील प्रत्येक गावाला उत्तम रस्ते, पूल, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा विकासाचा संकल्प आहे.
या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे, महावितरणचे AR बेरा साहेब, शाखा अभियंता पाटील साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान मात्रे, पद्मकर जऱ्हाड, भगवान बारगाजे, राजेंद्र बापू जऱ्हाड, उद्धव काळे, रवींद्र बोचरे, बाबासाहेब कराळे, विनोद मगरे, पप्पू कुलकर्णी, शेळके, नंदू शेळके, ताराचंद फुलमाळी, नंदू दाभाडे, विष्णू कोल्हे, संतोष वरकड, अनिल हिवाळे, दत्ता सिरसाट, काकासाहेब सिरसाठ यांच्यासह शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis