परतवाडा चौपदरीकरणासाठी नागरिकांचा निर्धार; आंदोलनाची दिशा ठरली
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)। सततची वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि प्रवाशांची गैरसोय, यामुळे संवेदनशील बनलेल्या अमरावती-परतवाडा मार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्त
परतवाडा चौपदरीकरणासाठी नागरिकांचा निर्धार; आंदोलनाची दिशा ठरली


अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)। सततची वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि प्रवाशांची गैरसोय, यामुळे संवेदनशील बनलेल्या अमरावती-परतवाडा मार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. २३ ऑगस्ट रोजी स्थानिक विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा, जनजागृती आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिक कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र रोडे, तर सचिवपदी प्रमोद डेरे यांची निवड करण्यात आली.

समितीच्या उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. अमरावती-परतवाडा मार्ग हा परिसराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता या मार्गाचे चौपदरीकरण आता केवळ मागणी राहिलेली नसून जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे, असा सूर बैठकीत उमटला. संजय जोशी, सतीशकुमार व्यास, हर्षद चव्हाण, अजय अग्रवाल, संतोष नरेडी, राजकुमार महल्ले, अरविंद घोम यांच्यासह उपस्थितांनी आपापली भूमिका मांडत शासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अमरावती-परतवाडा मार्गाचे चौपदरीकरण झालेच पाहिजे’, अशा घोषणांनी बैठकीचा परिसर दुमदुमून गेला. आगामी काळात शहरासह परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला संजय जोशी, सतीश व्यास, संतोष नरेडी, अजय अग्रवाल, हर्षद चव्हाण, राजकुमार महल्ले, विजय गोंडचवर, विश्राम कुळकर्णी, अरविंद घोम, निलकंठ गावंडे, गोवर्धन मेहरे, संतोष भालेराव, दीपक तायडे, गजानन पोरे, सचिन करडे, अजय अग्रवाल, श्रीकांत राजूरकर, विलास उदापूरकर, अनिल चऱ्हाटे, दिवाकर किटुकले, मुरलीधर ठाकरे, कैलास पेंढारकर, पदमाकर घोगरे, पंकज गुप्ता, डॉ. हर्षद मडघे, प्रीतेश अवघड, बंडू घोम, शुभम बरडे, जय हावरे, इम्मानूएल चव्हाण, विजय सोसे, विलास लांडे, सागर डांगे, विनोद इंगळे, नीलेश राऊत, संजीव डागा, अभिजित पडोळे, डॉ. कौस्तुभ ठाकरे, मधुकर नाकट, डॉ. विजय मोहोड, गिरीश दौलतानी, विजयकुमार थावानी, आशिष तायडे, निखिल जाधव, प्रा. साहेबराव दामोदरे, ॲड. दादा टाले, मोनू सुळे, सानू खान, इमरान अहमद खान, वसीम सुलतानी, भानुदास वानखडे, हरिदास धोटे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande