अमरावतीत २५३ पानटपऱ्यांवर धडक कारवाई
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.) । शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर पूर्णपणे नशामुक्त आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन कवच'' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. त्या अभिय
२५३ पानटपऱ्यांवर धडक कारवाई!


अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.) । शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर पूर्णपणे नशामुक्त आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन कवच' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. त्या अभियानाअंतर्गत शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या क्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या शाळा व महाविद्यालय परिसरातील तब्बल १२५३ पानटपऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शाळाच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट किंवा कोणतेही नशीले पदार्थ न विकण्याचे सक्त निर्देश परिसरातील किराणा दुकानदारांना देण्यात आले आहेत. सर्व ३१ पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी आपापल्या हद्दीतील शाळा-कॉलेज परिसरात सतत गस्त घालत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नागरिकांना, पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वा मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शाळा किंवा महाविद्यालय परिसराच्या आसपास कुठेही तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा किंवा सिगारेटची विक्री होताना आढळल्यास, त्याविषयीची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande