छ. संभाजीनगर - लिहाखेडी येथे शेतकरी संवाद बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। लिहाखेडी ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी अशोकराव साखळे यांच्या शेतात भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुनिल राणे यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत विविध समस्या व विकासाच्या गरजा जाणू
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। लिहाखेडी ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी अशोकराव साखळे यांच्या शेतात भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुनिल राणे यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत विविध समस्या व विकासाच्या गरजा जाणून घेतल्या.

यावेळी रस्ते, पाणी, वीज, शेती, घरकुल, रोजगार व शासनाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

याप्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी (राज्यमंत्री )भाजपा प्रदेश चिटणीस किरणजी पाटील, माजी आमदार सांडू पा लोखंडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, भाजपा सिल्लोड शहर मंडळाध्यक्ष मनोज मोरेल्लू, भवन मंडळाध्यक्ष एकनाथ हिवाळे, नगरसेवक स्वप्निल शिनगारे आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande