ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर, सेहवाग आणि द्रविडच्या मुलांना संधी
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.) ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामन्यांचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेस
आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.) ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामन्यांचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघात भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांचाही समावेश करण्यात आला आहे. तीन एकदिवसीय सामने आणि पहिला बहुदिवसीय सामना राजकोटमध्ये, तर दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

आर्यवीर दिल्ली प्रीमियर लीग २०२६ मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाचा भाग आहे, जिथे त्याच्या आक्रमक खेळाची तुलना त्याच्या वडिलांशी केली जात आहे. यापूर्वी २०२४ च्या कूचबिहार ट्रॉफीदरम्यान मेघालयाविरुद्ध २९७ धावा करून तो चर्चेत आला होता. यष्टीरक्षक अन्वय द्रविडचाही एकदिवसीय संघात समावेश आहे, त्याने जुलैमध्ये १९ वर्षांखालील संघाच्या श्रीलंका दौऱ्यात शानदार ८७ धावा केल्या होत्या. पण, दोन बहुदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघात आर्यवीर किंवा अन्वय या दोघांचाही समावेश नाही.

एकदिवसीय संघ

लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित उलविड, रोहित राव, मोहित यादव, व्ही. व्यंकट आणि काव्या पटेल.

बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर-19 संघ:

यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रैचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यादव, इशान ओम, अयान अक्रम, प्रणव सिंह, प्रणव अरविंद, प्रणव सिंह, अरविंद राव, अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक).

भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 वेळापत्रक

पहिला एकदिवसीय: 18 सप्टेंबर, राजकोट - सकाळी 9:00

दुसरी वनडे: 21 सप्टेंबर, राजकोट - सकाळी 9:00

तिसरी वनडे: २३ सप्टेंबर, राजकोट - सकाळी ९.००

पहिला बहु-दिवसीय आंतरराष्ट्रीय: 27-30 सप्टेंबर, राजकोट - 9:30 AM

दुसरा बहु-दिवसीय आंतरराष्ट्रीय: 5-8 ऑक्टोबर, अहमदाबाद बी ग्राउंड - सकाळी ९:३०

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande