किलियन एम्बाप्पेच्या हॅट-ट्रिकमुळे रियल माद्रिदचा ४-१ ने दणदणीत विजय
माद्रिद, २७ ऑगस्ट, (हिं.स.) - किलियन एम्बाप्पेच्या शानदार हॅट-ट्रिकच्या जोरावर रियल माद्रिदने ला लीगा २०२६-२७ मध्ये रियल सोसिएदादचा ४-१ असा पराभव केला. प्रशिक्षक होजे मोरिन्हो यांच्या सँटियागो बर्नाब्यू येथील पुनरागमनानंतरचा हा पहिलाच घरच्या मैदान
किलियन एम्बाप्पे


माद्रिद, २७ ऑगस्ट, (हिं.स.) - किलियन एम्बाप्पेच्या शानदार हॅट-ट्रिकच्या जोरावर रियल माद्रिदने ला लीगा २०२६-२७ मध्ये रियल सोसिएदादचा ४-१ असा पराभव केला. प्रशिक्षक होजे मोरिन्हो यांच्या सँटियागो बर्नाब्यू येथील पुनरागमनानंतरचा हा पहिलाच घरच्या मैदानावरचा सामना होता. मोरिन्हो यांच्या संघाने यापूर्वी एस्पॅन्योलविरुद्ध २-१ ने विजय मिळवला होता. पण बर्नाब्यू येथे सोसिएदादविरुद्धची त्यांची कामगिरी त्याहूनही अधिक प्रभावी होती.

पहिल्या हाफच्या पाचव्या मिनिटाला फेडेरिको वाल्वेर्देच्या पासवर डाव्या पायाने केलेल्या एका अप्रतिम शॉटने म्बाप्पेने रियलला आघाडी मिळवून दिली. मात्र, पहिला हाफ संपण्यापूर्वीच सोसिएदादने बरोबरी साधली. लुका सुकिचने चेंडूच्या दिशेत झालेल्या बदलाचा फायदा घेत गोलकीपर थिबॉ कोर्तुआला चकवून गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये रियल माद्रिदच्या विजयात ज्युड बेलिंगहॅमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दोन गोलांसाठी सहाय्य केले. प्रथम, बेलिंगहॅमने एमबाप्पेसोबत उत्कृष्ट समन्वय साधून त्याला चेंडू दिला. आणि त्याचे गोलमध्ये रूपांतर करून एमबाप्पेने रियलला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर बेलिंगहॅमने विलक्षण ताकद आणि दृढनिश्चय दाखवत, गोललाइनजवळ चेंडू वाचवला आणि तो विनिसियस ज्युनियरकडे पास केला. विनिसियसने कोणतीही चूक न करता गोल करत रियलची आघाडी ३-१ अशी वाढवली. त्यानंतर एमबाप्पेने विनिसियसच्या पासवर गोलकीपरच्या डोक्यावरून एक अप्रतिम चिप मारून आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली आणि रियल माद्रिदचा विजय निश्चित केला.

या विजयामुळे रियल माद्रिद सहा गुणांसह ला लीगाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सेव्हिया आणि रियल बेटिस यांचेही सहा गुण आहेत. रियल माद्रिदचा पुढील सामना रविवारी मालागा विरुद्ध होईल.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande