
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी हा निधी दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे
भोकर येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय, नांदेड–लातूर रेल्वे मार्ग, ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांबाबत तसेच पिंपळढव प्रकल्पासाठी ८५.४१ कोटींचे नाबार्ड अर्थसहाय्य मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आभार मानले.
म्हणजे पाठपुराव्याला मिळालेली सकारात्मक पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis