
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील ७५ महिला भगिनींनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन मोठ्या आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्ष संध्या कल्याणकर यांच्या विशेष प्रयत्नातून नांदेड जिल्हयामधून तब्बल ५ हजार ५५१ लाडक्या बहिणींनी राख्या आणि हृदयसंवाद पत्रे पाठवली आहेत. या पत्रांपैकी तळणी गावची लाडकी बहिण सुनीता सूर्यवंशी हिने लिहिलेल्या पत्राचे यावेळी जाहीररित्या वाचन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही मोठ्या आपुलकीने आणि आस्थेने लिहिलेली पत्रे हीच माझ्यासाठी या रक्षाबंधनाची सगळ्यात अमूल्य भेट असून तुम्ही दाखवलेल्या या प्रेम, विश्वास, आधार आणि जबाबदारीच्या ऋणातून मुक्त होणे मला कधीही शक्य होणार नाही असे याप्रसंगी विनम्रपणे नमूद केले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, संध्या कल्याणकर तसेच नांदेड जिल्हा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis