आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न
बीड, 27 ऑगस्ट (हिं.स.)। आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न ▪️हभप भरत महाराज सोडगीर यांनी विशद केली भगवान जिव्हेश्वरांची महती. परळी वैजनाथ येथे समस्त स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे य
जन्मोत्सव


बीड, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न

▪️हभप भरत महाराज सोडगीर यांनी विशद केली भगवान जिव्हेश्वरांची महती.

परळी वैजनाथ येथे समस्त स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अध्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी शोभायात्रा आणि कावड यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील जगमित्र मंदिर येथून नेहरू चौक, देशमुखपार, वैद्यनाथ गल्ली, वैद्यनाथ मंदिर ते जगमित्र मंदिर या मार्गे भगवान जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा व भगवान शंकराची कावड यात्रा काढण्यात आली. यात समस्त साळी समाज बांधव सहभागी झाले होते. यात मृदंग, टाळकरी महिला , ग्रंथ दिंडीत आणि कलशधारी महिला पताकाधारी मुले - मुली अशा या संवाद्य शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

दुपारी आयोजित काल्याच्या कीर्तनात हरिभक्त परायण भरत महाराज सोडगीर यांनी भगवान श्री जिव्हेश्वर बद्दल अभ्यासपूर्ण विवेचन करून उपस्थित समाज बांधवांना मंत्रमुग्ध केले.

शहरातील संत जगमित्र नागा मंदिर येथे जन्मोत्सव त्यानंतर पाळणा व आरती करण्यात आली. जगमित्र मंदिर सभागृहात भरत महाराज सोडगीर यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले होते यामध्ये भरत महाराजांनी अध्यय वस्त्र निर्माता भगवान श्री जिव्हेश्वरन बद्दल अभ्यासपूर्ण विवेचन करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करत आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध केले. दुपारी महाप्रसादासाठी भाविक आणि समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान शहराच्या नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती जयश्री गीते यांनी भेट देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

भगवान जिव्हेश्वरांच्या शोभा यात्रेत ग्रंथदिंडी आणि कावड यात्रेत महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यावेळी भगवान जिव्हेश्वर यांचा नाम घोष शिव नामाचा जयघोष, ,हर हर महादेव, जय शिवशंभो, आदि घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण केले.

लहान मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा महिलांसाठी वन मिनिट आणि संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांना बक्षीस वितरित करून त्यांचे कौतुक करण्यात आलं.यावेळी मुख्य अन्नदाते मुंजाभाऊ धोंडिबा पोटे यांच्या सहकार्याबद्दल समाजाचे वतीने त्यांच्या यथोचित गौरव करण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सायं. आरती होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande