नांदेड - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवरील झेंडा हटवला
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। एअरपोर्ट, सांगवी बु. नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी नियोजित केलेल्या जागेवर झेंडा लावण्यात आल्याची माहिती मिळताच, रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅड. अमन दादा आंबेडकर यांच्या आदेशान्वये रिपब्लिकन सेने
अ


नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। एअरपोर्ट, सांगवी बु. नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी नियोजित केलेल्या जागेवर झेंडा लावण्यात आल्याची माहिती मिळताच, रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅड. अमन दादा आंबेडकर यांच्या आदेशान्वये रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून सदर झेंडा पोलिस प्रशासनाकडून त्या ठिकाणाहून हटविण्यात आला. तसेच या प्रकरणात पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असा शब्द पोलिस प्रशासनाने दिला.

यावेळी रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेमिलाताई वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव शंकर थोरात तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande