नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत मिळवले स्थान
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हंगामाची अंतिम फेरी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात येणार आहे. दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरजने या हंगाम
Sports Athletics Neeraj Diamond League Final


नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हंगामाची अंतिम फेरी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात येणार आहे.

दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरजने या हंगामात डायमंड लीगच्या दोन टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. त्याने 19 जून रोजी दोहा टप्प्यात 85.69 मीटरच्या प्रयत्नासह चौथे स्थान मिळवले होते. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी लॉझान टप्प्यात 88.05 मीटरची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान मिळवले. नीरज 27 ऑगस्ट रोजी ज्युरिख टप्प्यात सहभागी झाला नाही, जिथे पुरुषांची भालाफेक स्पर्धाही कार्यक्रमात समाविष्ट होती. मात्र, लॉझानमधील त्याच्या कामगिरीने अंतिम फेरीत स्थान पक्के करण्यासाठी पुरेसे गुण मिळवून दिले. नीरजने या हंगामात ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही 85.83 मीटरच्या थ्रोसह रौप्यपदक जिंकले होते.

ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वी श्रीलंकेचा रुमेश थारंगा पाथिरागे भालाफेकीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याने ज्युरिख टप्प्यात 92.07 मीटरच्या शानदार प्रयत्नासह विजय मिळवला. अँडरसन पीटर्स, केशोर्न वॉलकॉट आणि कर्टिस थॉम्पसन हे देखील विजेतेपदाचे प्रमुख दावेदार आहेत. नीरजचे लक्ष त्याच्या दुसऱ्या डायमंड ट्रॉफी विजेतेपदावर असेल. त्याने 2022 मध्ये डायमंड लीगचे विजेतेपद जिंकले होते आणि त्यानंतर तीन वेळा उपविजेता राहिला आहे.

डायमंड लीगमध्ये असे मिळतात गुण

डायमंड लीगमध्ये मे ते सप्टेंबर दरम्यान 14 टप्पे असतात. प्रत्येक स्पर्धेत पहिल्या आठ खेळाडूंना अनुक्रमे 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 गुण मिळतात. नीरजने दोहा येथे चौथ्या स्थानासाठी सात आणि लॉझानमध्ये दुसऱ्या स्थानासाठी पाच गुण मिळवले, ज्यामुळे त्याचे एकूण 12 गुण झाले. केनियाचा ज्युलियस येगो ज्युरिख टप्प्यापूर्वी नऊ गुणांवर होता. ज्युरिखमध्ये 81.66 मीटरच्या प्रयत्नासह पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर त्याचे 13 गुण झाले आणि त्यानेही अंतिम फेरीसाठी क्वालीफाय केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande