उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सार्वभौम एआय स्टॅकचे केले अनावरण
कृत्रिम बुद्धिमत्ता संधींचे नवे मार्ग खुले करेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीला पुढच्या टप्प्यावर नेईल - उपराष्ट्रपती नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे ज्ञानी एआयने विकसित केलेल्या
VP C.P. Radhakrishnan Unveils Sovereign AI Stack


VP C.P. Radhakrishnan Unveils Sovereign AI Stack


VP C.P. Radhakrishnan Unveils Sovereign AI Stack


कृत्रिम बुद्धिमत्ता संधींचे नवे मार्ग खुले करेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीला पुढच्या टप्प्यावर नेईल - उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे ज्ञानी एआयने विकसित केलेल्या ‘ज्ञानी अर्थ’ या सार्वभौम एआय स्टॅकचे अनावरण केले. यामध्ये इव्हॉन 3.3 आणि प्लेक्सस यांचा समावेश आहे. इव्हॉन 3.3 हे एक मोठे भाषिक प्रारूप आहे तर प्लेक्सस हे एक असे व्यासपीठ आहे जे एआय बुद्धिमत्तेला वास्तविक जगातील काम आणि संस्थांशी जोडते.

ज्ञानी अर्थच्या आरंभाचे स्वागत करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, इव्हॉन 3.3 आणि प्लेक्सस यांचे संयोजन भारताच्या तंत्रज्ञान व्यवस्थेची वाढती ताकद दर्शवते आणि हे सिद्ध करते की भारतीय अभियंते केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच करू शकत नाहीत, तर ते विकसितही करू शकतात.

सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, टाइपरायटर आणि वैयक्तिक संगणकांच्या मर्यादित वापराच्या युगापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या युगापर्यंत तंत्रज्ञानात मोठे परिवर्तन झाले आहे. संगणकांमुळे नोकऱ्या जातील, या चिंतेचा उल्लेख करत त्यांनी नमूद केले की उलट माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने भारतात आणि परदेशात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण केल्या. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, एआय देखील रोजगार आणि विकासाचे नवीन मार्ग खुले करेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीला पुढील टप्प्यावर घेऊन जाईल.

उपराष्ट्रपतींनी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील भारताच्या वेगवान प्रगतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की भारताच्या तांत्रिक परिवर्तनाला मोठी गती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मिळाली आहे, त्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि 'भारत प्रथम' दृष्टिकोनाप्रती असलेली वचनबद्धता यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये भारताची क्षमता बळकट होत आहे. संसदेतील एआयच्या वापरावर प्रकाश टाकत ते म्हणाले की डिजिटल संसद पोर्टलमुळे संसदीय चर्चा आणि कागदपत्रे अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होतात. स्वदेशी तांत्रिक क्षमता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “आपण नेहमीच ग्राहक बनून राहता कामा नये; आपण निर्मिती केली पाहिजे जेणेकरून इतर त्याचा उपभोग घेऊ शकतील.”

उपराष्ट्रपती म्हणाले की विकसित भारत@2047 च्या दिशेने होत असलेल्या भारताच्या प्रवासात तांत्रिक क्षमता हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असेल आणि 'ज्ञानी अर्थ' हा तांत्रिक आत्मनिर्भरता, नवोन्मेष व जागतिक नेतृत्वाच्या दिशेने होणाऱ्या व्यापक राष्ट्रीय प्रवासाचा एक भाग आहे. त्यांनी ज्ञानी एआयचे सीईओ गणेश गोपालन आणि सह-संस्थापक व सीटीओ अनंत नागराज यांचे या शुभारंभाबद्दल अभिनंदन केले आणि हा उपक्रम अधिक मजबूत, आत्मनिर्भर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम भारताच्या उभारणीत योगदान देईल, अशी आशा व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande