इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणकडून दोन नागरिकांना फाशी
तेहरान, 03 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने हेरगिरी आणि इस्रायलसोबत सहकार्य केल्याच्या आरोपाखाली सोमवारी आपल्या दोन नागरिकांना फाशी दिली. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी फाशीच्या शिक्षांमध्ये वाढ होत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या न्
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणकडून दोन नागरिकांना फाशी


तेहरान, 03 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने हेरगिरी आणि इस्रायलसोबत सहकार्य केल्याच्या आरोपाखाली सोमवारी आपल्या दोन नागरिकांना फाशी दिली. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी फाशीच्या शिक्षांमध्ये वाढ होत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

इराणच्या न्यायपालिकेच्या माहितीनुसार, ओमिद बेहजाद आणि पौरिया सफवत यांच्यावर अलीकडील संघर्षादरम्यान इस्रायलला लष्करी आणि सुरक्षा तळांचे स्थाननिर्देशांक (कोऑर्डिनेट्स), छायाचित्रे तसेच संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप होता.या दोघांविरुद्ध देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

या फाश्या अशा वेळी देण्यात आल्या आहेत, जेव्हा इराणने जानेवारी महिन्यात देशभर उसळलेल्या असंतोष आणि आंदोलनांवर कठोर कारवाई करत हजारो आंदोलकांचे आंदोलन दडपल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर नव्या हल्ल्यांची मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणसोबत चर्चा होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले की, सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात कोणतीही औपचारिक चर्चा सुरू नाही. सध्याचा संघर्ष फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर सुरू झाला. त्याआधी इराणवर त्याच्या अणु कार्यक्रम, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि जानेवारीतील आंदोलनांवरील कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आठवडे दबाव वाढत होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande