राष्ट्रपती मुर्मू यांनी उत्कलमणि गोपबंधू दास यांच्या पुतळ्याचे केले अनावरण
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी लाजपत नगर येथील लाजपत भवनमध्ये महान स्वातंत्र्यसैनिक, प्रसिद्ध समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार उत्कलमणि गोपबंधू दास यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. राष्ट्रपतींनी कार्यक्रमात
PRESIDENT GOPABANDHU STATUE


नवी दिल्ली, 03 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी लाजपत नगर येथील लाजपत भवनमध्ये महान स्वातंत्र्यसैनिक, प्रसिद्ध समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार उत्कलमणि गोपबंधू दास यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

राष्ट्रपतींनी कार्यक्रमात सर्वप्रथम लोकसेवक मंडळाचे संस्थापक आणि महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी रिमोटचे बटन दाबून उत्कलमणि गोपबंधू दास यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दिल्लीमध्ये स्थापित करण्यात आलेला गोपबंधू दास यांचा हा पहिलाच पुतळा आहे. गोपबंधू दास यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब, वंचित, अनाथ आणि पीडित मानवतेच्या सेवेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी तसेच राष्ट्रजागृतीसाठी समर्पित केले. त्यांच्या अतुलनीय सेवा कार्यामुळे त्यांना ‘उत्कलमणि’ (ओडिशाचा रत्न) या उपाधीने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात लोकसेवक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चोपडा आणि राष्ट्रीय सचिव रमानाथ झा यांनी राष्ट्रपतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लोकसेवक मंडळाचे मीडिया प्रभारी रविशंकर मिश्र यांनी सांगितले की, या समारंभात केंद्रीय मंत्री जुअल ओराम, माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा, डॉ. संत्रुप्त मिश्रा तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दीपक मालवीय आणि राजेंद्र कुमार जेना यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच सर्वांनी उत्कलमणि गोपबंधू दास यांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण केली.

समारंभादरम्यान राष्ट्रपतींनी लोकसेवक मंडळाच्या आजीवन सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्यासोबत स्मृतिचित्रेही काढली. यावेळी उत्कलमणि गोपबंधू दास यांचे कुटुंबीय, देशातील विविध राज्यांतून आलेले समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच लोकसेवक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. वक्त्यांनी गोपबंधू दास यांच्या सेवा, त्याग, शिक्षण आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शांचे स्मरण करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande