आरबीआयची मौद्रिक आढावा बैठक सुरू; रेपो रेटमध्ये बदलाची शक्यता कमी
मुंबई, 03 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्वैमासिक मौद्रिक धोरण समिती (एमपीसी) ची तीन दिवसीय आढावा बैठक सोमवारी येथे सुरू झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ही बैठक 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. य
RBIs monetary policy review meeting begins


मुंबई, 03 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्वैमासिक मौद्रिक धोरण समिती (एमपीसी) ची तीन दिवसीय आढावा बैठक सोमवारी येथे सुरू झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ही बैठक 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती संजय मल्होत्रा 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता देतील.

आरबीआयने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, इनसाइट्स, आकलन आणि पुढील वाटचाल, लवकरच येत आहे. बँकेने सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मौद्रिक धोरण समितीच्या निवेदनासाठी सज्ज राहा. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात एमपीसीची दुसरी बैठक जूनमध्ये घेतली होती. त्यामध्ये रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. मात्र, 2027 मधील महागाई दराचा अंदाज 4.6 टक्क्यांवरून वाढवून 5.1 टक्के करण्यात आला होता.

आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातील संकट आणि महागाईच्या जोखमींचा विचार करता आरबीआय यावेळीही धोरणात्मक दर असलेल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल करणार नाही. केंद्रीय बँक रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवू शकते.

उल्लेखनीय आहे की, या आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एमपीसीच्या एकूण 6 बैठका होणार आहेत. ही एमपीसीची तिसरी बैठक आहे. पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली होती. आरबीआयने आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांची कपात केली होती, जो सध्या 5.25 टक्क्यांवर कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande