पाकिस्तानात दहशतवाद विरोधी रॅलीवर आत्मघाती हल्ला; १४ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद, 03 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याजवळ गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रविवारी आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. या हल्
पाकिस्तानात दहशतवादविरोधी रॅलीवर आत्मघाती हल्ला; १५ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद, 03 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याजवळ गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रविवारी आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील काबल शहरात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा क्षण कैद झाला आहे. तेथे आंदोलक उग्रवादाविरोधात घोषणाबाजी करत होते आणि शांततेची मागणी करत होते. बॉम्बस्फोट होताच परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या आपत्कालीन सेवा विभागाचे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी माध्यमांना सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने उग्रवादाविरोधी घोषणा देत शांततेची मागणी करणाऱ्या लोकांच्या गर्दीला लक्ष्य केले.

स्वात विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) फिदा हुसेन यांनी माध्यमांना सांगितले, “या आत्मघाती हल्ल्यात आठ पोलीस अधिकाऱ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, २२ जण जखमी झाले असून आणखी एक मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे. तो हल्लेखोराचाच असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फिदा हुसेन म्हणाले, “एका आत्मघाती हल्लेखोराने चौकात असलेल्या पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर त्याने स्वतःला उडवून दिले.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande