
मुंबई, 03 ऑगस्ट (हिं.स.)। प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी हिंदी ओरिजिनल सीरिज ‘जॉब ट्रॅफिकिंग’ची पहिली झलक जारी केली आहे. प्रशांत नायर यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेली ही आठ भागांची सर्व्हायव्हल ड्रामा सीरिज ऑनलाइन फ्रॉड आणि मानव तस्करीच्या धोकादायक संगनमतावर आधारित आहे. या सीरिजची निर्मिती सेलेक्ट मीडिया होल्डिंग्स आणि चॉकबोर्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रतीक खन्नूजा, समीर चंद, विकेश भूटानी आणि शुजात सौदागर यांनी केली आहे. यात निमरत कौर, रोशन मॅथ्यू, काव्या त्रेहान आणि पवन मल्होत्रा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज ऑनलाइन फसवणुकीच्या त्या नेटवर्कचा पर्दाफाश करते, ज्याला जगभरात ‘पिग बुचेरिंग’ स्कॅम या नावाने ओळखले जाते. या कथेत अशा तरुणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, ज्यांना परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून सीमापार नेले जाते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने सायबर फसवणुकीच्या टोळीचा भाग बनवले जाते. ही सीरिज या गुन्ह्यामागील शोषण, मजबुरी आणि संघटित नेटवर्कचे अनेक स्तर उलगडते.
‘जॉब ट्रॅफिकिंग’ ही तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची कथा आहे—एक स्कॅमर जो या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, एक फसवणुकीची शिकार झालेली गृहिणी जी न्यायाच्या शोधात आहे आणि एक सीईओ जो परिस्थितीच्या कचाट्यात अडकतो. या तिघांचे आयुष्य फसवणूक, तुटलेला विश्वास आणि गुन्ह्याच्या अशा जाळ्यात अडकते, ज्यातून बाहेर पडणे सोपे नसते. रोमांच, भावना आणि हाय-स्टेक ड्रामाने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना सायबर गुन्ह्याची भयावह सत्यता आणि माणुसकीच्या लढ्याशी परिचित करून देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule