स्कुटीची डंपरला धडक : दोघांचा मृत्यू
जळगाव, 31 ऑगस्ट (हिं.स.)गलवाडे रस्त्यावर धावत्या स्कुटीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना पेट्रोल पंपाजवळ घडली. पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५), दोघेही रा. र
स्कुटीची डंपरला धडक : दोघांचा मृत्यू


जळगाव, 31 ऑगस्ट (हिं.स.)गलवाडे रस्त्यावर धावत्या स्कुटीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना पेट्रोल पंपाजवळ घडली. पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५), दोघेही रा. रंजाणे, ता. जामनेर, अशी मृतांची नावे आहेत. पंडित भिल व नागो सपकाळे हे दोघे स्कुटी क्रमांक एमएच ५४ ई ७६४ वरून गलवाडे येथे भंडारा प्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पंडित भिल स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते. कार्यक्रम आटोपून दोघे गलवाडेहून परतत असताना पेट्रोल पंपाजवळ स्कुटीवरील नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपर क्रमांक एमएच १८ एम ७८५७ वर स्कुटी जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की पंडित भिल यांना गंभीर दुखापत झाली, तर नागो सपकाळे यांनाही जोरदार मार लागला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयूर पाटील, गणेश पाटील आणि अविनाश भदाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande