अमरावती : जनावरांची तस्करी रोखताना पोलिसावर जीवघेणा हल्ला
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.) | जनावरांची तस्करी राखण्याच्या मोहिमेदरम्यान एका अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने एका पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पोलिसाच्या उजव्या खांद्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर द
जनावरांची तस्करी रोखण्याच्या मोहिमेदरम्यान बोलेरो गाडीने पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न


अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.) | जनावरांची तस्करी राखण्याच्या मोहिमेदरम्यान एका अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने एका पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पोलिसाच्या उजव्या खांद्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे. मोर्शी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकापासून सुमारे एक किलोमीटर पूर्वेला घडली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, एक पांढरा बोलेरो पिकअप ट्रक कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होता. वाहन हिरव्या ताडपत्रीने झाकलेले होते. पिकअप ट्रकला पुढची नंबर प्लेट नव्हती, तर मागच्या बाजूला नंबर प्लेटच्या जागी ठळक अक्षरात 'शेतकरी' असे लिहिलेले होते आणि ३४९० हा क्रमांक होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी अधिकृत कर्तव्यावर असताना, जनावरांच्या तस्करीच्या संशयावरून ते वाहन थांबवून कारवाई करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी, भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकाने पोलिसाच्या दिशेने अज्ञात चालकाने पोलिसाला ठार मारण्याच्या उद्देशाने वळण घेतले. तक्रारीनुसार, बोलेरो पिक अप ट्रकच्या त्याच्या अंगावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या धडकेमुळे पोलिसाच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा खांदा निखळला. तसेच, त्याच्या उजव्या कोपराला, दोन्ही गुडघ्यांना, कंबर आणि पाठीलाही गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर, जखमी पोलिसाला उपचारासाठी नेण्यात आले. तक्रारीनुसार पोलीस कर्मचारी अधिकृत आणि पोलिसाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी चालकाने जाणीवपूर्वक त्याला गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर, चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी है वाहनाचा रंग, क्रमांक आणि त्यावर लिहिलेल्या ब वर्णनाच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे. तक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे मोर्शी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक तुषार चव्हाण करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande