एटीएम मशिन तोडून आतील पैसे चोरण्याचा प्रयत्न
नांदेड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। श्री गणरायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पाळज येथे अज्ञात चोरट्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे शटर फोडून आत प्रवेश केला. मात्र, बँकेतून त्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरीचा प्रयत्न फसला असला तरी या घटनेमुळे परि
एटीएम मशिन तोडून आतील पैसे चोरण्याचा प्रयत्न


नांदेड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

श्री गणरायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पाळज येथे अज्ञात चोरट्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे शटर फोडून आत प्रवेश केला. मात्र, बँकेतून त्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरीचा प्रयत्न फसला असला तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी पोलिसांना तक्रार दिली की, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने बँकेचे शटर व एटीएम चे कुलूप फोडून बँकेत प्रवेश करून लोखंडी स्ट्रांग रूम आणि एटीएम मशिन तोडून आतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. बँक फोडण्यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल कापल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चोरट्यांनी बँक परिसराची आधीच रेकी केली असावी, तसेच येथील सुरक्षाव्यवस्थेची माहिती घेतली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरचे पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सपोनि बी. आर. कांबळे यांनी भेट दिली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande