अमरावतीतील १६७ वर्षे जुने ब्रिटिशकालीन ऐतिहासिक रेल्वे स्थानक पाडण्याच्या हालचाली
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य सरकारने अधिकृतपणे ''हेरिटेज'' (ऐतिहासिक वारसा) घोषित केलेले अमरावतीचे ऐतिहासिक जुने रेल्वे स्थानक चक्क जमीनदोस्त करण्याकडे प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. तब्बल १६७ वर्षे जुनी असलेली ही ब्रिटिशकालीन वास्तू कोणाच्या प
अमरावतीची १६७ वर्षे जुनी ब्रिटिशकालीन ऐतिहासिक रेल्वे स्थानक जमीनदोस्त करण्यास सुरुवात


अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य सरकारने अधिकृतपणे 'हेरिटेज' (ऐतिहासिक वारसा) घोषित केलेले अमरावतीचे ऐतिहासिक जुने रेल्वे स्थानक चक्क जमीनदोस्त करण्याकडे प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. तब्बल १६७ वर्षे जुनी असलेली ही ब्रिटिशकालीन वास्तू कोणाच्या परवानगीने तोडली जात आहे, असा संतप्त सवाल आता समस्त अमरावतीकर विचारू लागले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे शासनाने जाहीर केलेल्या हेरिटेज यादीला आणि नियमांना काही किंमत आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.या प्रकरणाबाबत समस्त अमरावतीकरांनी एकत्र येत आवाज उठविणे गरजेचे आहे..

अमरावती रेल्वे स्थानकाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. सन १८५९ मध्ये या स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले होते आणि तिथून अमरावतीच्या रेल्वे वाहतुकीची ऐतिहासिक सुरुवात झाली होती. ब्रिटीशकालीन स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. याच ऐतिहासिक महत्त्वामुळे राज्य शासनाने अमरावती व बडनेरा शहरांमधील ज्या ५५ महत्त्वाच्या जुन्या वास्तू, इमारती आणि स्थळांना 'हेरिटेज' म्हणून घोषित केले आहे, त्या यादीत या जुन्या रेल्वे स्थानकाचा प्रामुख्याने समावेश आहे. असे असतानाही, प्रशासनाने हा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा घाट रचल्याने इतिहासप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

५५ स्थळे हेरिटेज यादीत; तरीही प्रशासनाचा मनमानी कारभार?नेते मंडळी चिडीचूपशासकीय नियमांनुसार, हेरिटेज यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही वास्तूचे मूळ स्वरूप बदलण्यास किंवा ती तोडण्यास कडक कायदेशीर निर्बंध असतात. अमरावती आणि बडनेरा शहराची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी ५५ वास्तू हेरिटेज म्हणून, तर अन्य सहा स्थळे आणि तलाव हे पर्यटन स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत जुने रेल्वे स्टेशन पाडण्याचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे.प्रशासनाकडून या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.तर अमरावती मधील सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी मात्र चिडीचूप आहे हे विशेष. हे रेल्वे स्थानक पाडल्यास अमरावतीची शान आणि इतिहास कायमचा पुसला जाईल. हा ऐतिहासिक वारसा नष्ट न करता त्याचे तातडीने संवर्धन व सुशोभीकरण करणे गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande