
नगराध्यक्ष नगरसेवकांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील नगर पंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता नगर पंचायतीनी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करून अखेर सदर जागेला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना शॉल पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
नगर पंचायत अस्तित्वात आली तेव्हा पासून शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पाच्या जमिनीचा प्रश्न १० वर्षांपासून प्रलंबित होता. शहरातील गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने स्वच्छतेवर प्रश्नाचिन्ह अनेक वर्षांपासून निर्माण झाला होते सन २०२६ मध्ये नगर पंचायतची निवडणूक होऊन नवनियुक्त नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी शासन स्तरावर व मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचे यशस्वी पाठपुराव्याला अखेर यश आले असून मौजा बच्छाराजपुर येथील २ हेक्टर जागा घनकचरा व्यवस्थापना करिता व शहरातील सांडपाणी व्यवस्थापना करिता मौजे मुंड झुंझारराव १ हेक्टर जागेला मंजुरात दिली असून शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक विकासाच्या दृष्टीने शहराच्या विकासात भर पडणार आहे.
१० वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची नुकतीच नगराध्यक्ष नगरसेवक यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत आभार मानले यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर, स्वच्छता सभापती ज्योत्स्ना धवसे, सभापती कांता लोमटे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी