दुलीप ट्रॉफी: वैभव सूर्यवंशी ९२ धावांवर बाद, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी हुकली
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट (हिं.स.) वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत इतिहास रचण्याची संधी गमावली. पूर्व विभागाकडून मध्य विभागाविरुद्ध खेळताना, सूर्यवंशी ८१ चेंडूंमध्ये ९२ धावांवर बाद झाला आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा स
वैभव सूर्यवंशी


नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट (हिं.स.) वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत इतिहास रचण्याची संधी गमावली. पूर्व विभागाकडून मध्य विभागाविरुद्ध खेळताना, सूर्यवंशी ८१ चेंडूंमध्ये ९२ धावांवर बाद झाला आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज होण्यापासून केवळ आठ धावा दूर राहिला.

वयाच्या १५ वर्षे आणि १५७ दिवसांत, सूर्यवंशीला सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची एक मोठी संधी होती. तेंडुलकरने वयाच्या १५ वर्षे आणि २३० दिवसांत १९८८ च्या रणजी ट्रॉफी सामन्यात आपले पहिले प्रथम-श्रेणी शतक झळकावले होते. मात्र, प्रथम-श्रेणी शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज म्हणून विक्रम अजूनही ध्रुव पांडोवेच्या नावावर आहे. त्याने १९८८ मध्ये वयाच्या अवघ्या १४ वर्षे आणि २९३ दिवसांत आपले शतक झळकावले.

सूर्यवंशीचे शतक हुकले, पण त्याने आपल्या खेळीदरम्यान एक नवीन विक्रम रचला. तो दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. सूर्यवंशीने आपल्या ८१ चेंडूंच्या खेळीत आक्रमक फलंदाजी केली, पण ९२ धावांवर असताना हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने चेंडू डीप मिडविकेटवरून पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल घेतला. या खेळीने सूर्यवंशीला सचिन तेंडुलकरचा जवळपास ३८ वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी होती, पण तो शतकापासून आठ धावांनी दूर राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande