हरसूल पोलिसांनी गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी पकडली , वाहनासह एक जण ताब्यात
त्र्यंबकेश्वर , 31 ऑगस्ट (हिं.स.)। त्र्यंबक तालुक्यातील हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत परराज्यातून दुर्गम भागात गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले असता वाहनासह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हाती
हरसूल पोलिसांनी गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी पकडली , वाहनासह एक जण ताब्यात


त्र्यंबकेश्वर , 31 ऑगस्ट (हिं.स.)।

त्र्यंबक तालुक्यातील हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत परराज्यातून दुर्गम भागात गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले असता वाहनासह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना गुप्त बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून दलपतपूर-हरसूल रस्त्यावर संशयित वाहनास अटकाव करून, तपासणी केली असता एमजी हेक्टोर कार (क्रमांक जी.जे. २७ डी.बी. ८६२६) यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला व सुगंधी तंबाखू, गुटखा गुटख्याचा माल असल्याची खात्री केली. चालक आशिष

गायकवाड (वय ३५, घर क्र. १९८, नेपाळी कॉर्नर, शालीमार, नाशिक) यास ताब्यात घेतले आहे. वाहनामध्ये ३ लाख ३९ हजार ३४० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा तंबाखू आणि १० लाख रुपये किमतीचे वाहन असा १३ लाख ३९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुन्हयाचा तपास सपोउनि दिनकर बोरसे हे करत आहेत.

डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, विमला एम., अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन बोरसे, रघुनाथ गावीत, दिनकर बोरसे, तुळशीराम चौधरी, तुकाराम भोये, रविकिरण पवार, युवराज चव्हाण, प्रशांत काकड यांनी ही कामगिरी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande